सन्माननीय सभासद बंधू -भगिनींनो-
संस्थेच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस आपण सर्वजण आवर्जून उपस्थित आहात . याबद्दल: मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आपले संस्थेचा 47 वा वार्षिक अहवाल सर्व संचालक मंडळाचे वतीने मी आपणास सादर करत आहे. याचा मला मनापासून आनंद होत आहे. आपले संस्थेची स्थापना ६ एप्रिल १९७८ रोजी झाली व आज आपण ४८व्या वर्षात यशस्वी पदापर्ण करणार आहोत. आपल्या संस्थेचे नाव स्थापनेपासून अहमदनगर जिल्हा सहाय्यक ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर असे होते. त्यात संस्थेने दिनांक २४. १२ १३ रोजी छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित ,अहमदनगर असे होते आपल्या ग्रामसेवक या पद नामावली मध्ये बदल होऊन आपण सर्व ग्रामपंचायत अधिकारी या पदावर कार्य करीत असल्याने आपले संस्थेचे नावातही आपण छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहिल्यानगर या नावाने आता शासन दरबारी आहोत. आपल्या अग्रगण्य सहकारी संस्थेची सर्वाच्या सहकार्याने उत्तरोत्तर प्रगती होत आहे. व स्पर्धात्मक वातावरणात ही संस्थेने नेत्रदिपक प्रगती केलेली आहे. व महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वावर चालणारी एकमेव संगणकृत संस्था म्हणून नावलौकिक मिळविला आहे.ज्या सामाजिक बांधलीकीतुन संस्थेची स्थापना झाली ते कार्य आपल्या कार्यक्षमतेने व जबाबदारी पार पाडण्यात संस्था यशस्वी झालेली आहे. अर्थात या सर्वांची श्रेय आपणा सर्वांनाच आहेच. तसेच संस्थेने चालू वर्षी एस. एस . एमएस.सेवा व ईमेल सुद्धा चालू केलेला आहे. ई मेल ऍड्रेस shivajigramsevak@ असा आहे. आपण सर्वांनी संचालक मंडळावर टाकलेला प्रचंड विश्वास व श्रद्धा यामुळे संस्था गरुड झेप घेऊ शकली. आपणा सर्वांचे संस्थेवरील प्रेम, निष्ठा व अढळश्रद्धा असेच राहून भविष्यात ती वृद्धिंगत होईल. अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांचे पुनश्च: स्वागत.…...
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अहिल्यानगर या वित्तीय संस्थेने आपले संस्थेत सरासरी १३ टक्के दराने कर्जपुरवठा आपले संस्थेस केलेला आहे. परंतु आपले संस्थेने सभासदांचे हिताकरिता केवळ नफा हा हेतू न ठेवता आपले सभासदांना रुपये ६ लाख पर्यंतचे कर्जास ७ टक्के व तातडी कर्ज रुपये एक लाख १३% इतक्या अल्पव्याज दराने कर्जपुरवठा केला आहे. तसेच रुपये सहा दाखवली घरचाच तेरा टक्के व्याज आकारणी केलेली आहे. व सभासदांनी २०२४ -२०२५ साला भरलेल्या वाजावर ७% व्याज रिबेट देण्याचे धोरण आखलेले आहे. संस्थेने सभासदाकडून घेतलेले व्याज व वित्तीय संस्थेत दिलेले व्याज यात फार मोठी तफावत आहे. यात कोणतेही प्रकारचे आर्थिक हित नसून फक्त सभासदांची हित जोपासलेले आहे. तसेच संस्थेचे सभासदांची कर्जमर्यादा, देयपगाराचे ३० पट किंवा जास्तीत जास्त रुपये २५ लाख करणेत आलेली असून तातडी कर्ज रुपये १ लाख करण्यात आलेले आहे.
सदरची तफावत पाहता. परंतु कमीत कमी खर्चात संस्थेचा कारभार चालवून जास्तीत जास्त नफा मिळविल्यानें संस्थेने लाभांष (डिव्हीडंट) १५ टक्के दराने व कायम ठेवीवर १० टक्के व्याज देण्याची तरतूद केली आहे. व मुदतठेवीवर सभासद व बिगर सभासद यांना १० टक्के व सेवानिवृत्त सभासद तसेच अपंग व विधवा महिला यांना १०. ५०% इतके भरीव व्याज दर ठेवून ७ टक्के व्याज रिबेट देण्याचे व सभासदांचे हिताची काळजी घेतलेली आहे. सदरची बाब संस्थेचे दृष्टीने अभिमानास्पद आहे. भागभांडवल, कायमठेव , व मुदत ठेव यामुळे संस्थेचा पाया भक्कम झालेला आहे.
तसेच संस्थेने अहवाल वर्षात सभासदांना कर्जाची रक्कम बँकेची संपर्क करून ABB व RTGS द्वारे थेट त्यांचे बँक खात्यात वर्ग करणे बाबत कार्यवाही केलेली आहे. तसेच संस्थेची सभासद व कर्मचारी यांच्यात समन्वय राहावा. म्हणून कार्यालय CCTV अंतर्गत तसेच WI_FI अंतर्गत समाविष्ठ केलेले आहे. सभासदांचे कर्जातून होणारे शेअर्स अथवा कायमठेव कपात १०% ऐवजी ५% करणेत आलेली आहे .तसेच मयत सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचे कुटुंबियांना रु ५ लाख कुटुंब आधार योजनेअंतर्गत व दोन लाख रुपयांची मुदत तेव्हपावती व शेअर्स व कायमठेव रक्कम परत देण्यात येते तसेच हृदयविकारासारखे आजारास रुपये ५० हजार आर्थिक मदत केली जात आहे. या सर्व बाबी भूषणावह आहेत. तसेच सभासदत्व त्यांचे मुला/मुलींचे विवाहप्रित्यर्थ रुपये ११०००/-विवाह भेट देण्यात येते समान उद्देश असणारे पतसंस्थांकडून सभासदाचे कर्ज उचल
सभासदांनी आपल्या संस्थेकडून कर्ज घेऊन त्याचे ठरवून दिलेल्या हप्त्याप्रमाणे नियमितपणे फेड करावी. अन्य संस्थाकडून कर्ज घेऊन स्वतःस व संस्थेत अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे कोणतेच कर्ज आपण वेळेत फेड करू शकत नाही. मासिक हप्त्याची थकबाकी होते. त्यामुळे संस्थेकडून प्रासंगिक वेळी कर्ज मिळण्यास अडचणी होते. त्यामुळे मानसिक समतोल बिघडून जातो. त्याचा कौटुंबिक व नोकरी विषयक जिवनावर अनिष्ट परिणाम होत आहे. याचा गंभीरपणे विचार करून आपण एकाच संस्थेकडून कर्ज घ्यावे व त्याची नियमित ठरवून दिलेल्या हप्त्यात परतफेड दरमहा करावी. व सहकार कायद्यानुसार व जिल्हा सहकारी बँकेचे नियमानुसार समान उद्देश असणारे संस्थेची कर्ज घेणारे सभासदांना दुबार कर्ज वाटप करण्यात येत नाही. तरी यापुढे अशा सभासदांनी संस्थेस सहकार्य करावे. सभासदांना जामीनकीचे जबाबदारी आवाहन
संस्था सभासदांना रुपये २६ लाख पर्यंत खर्च देऊन त्यांच्या प्रापंचिक गरजा पूर्ण करण्याचा नियमितपणे प्रयत्न करीत आहे. संस्थेचा एक हेतू आहे. कोणत्याही प्रसंगी आपल्या प्रासंगिक गरजा भागविण्यासाठी आपल्या ग्रामसेवक सभासदाला कोणाकडेही हात पसरवा लागू नये. आपल्या संस्थेत यावे. आणि कर्जरोखा (आवश्यक त्या स्टॅम्प्सह) पूर्ण करून देऊन कर्ज रक्कम तात्काळ सभासदांचे बँक खात्यावर वर्ग करून घ्यावे. अशी सोय केलेली आहे. याचा फायदा सर्व सभासद गरजेनुसार अतिशय चांगल्या प्रकारे घेत आहे. त्याचबरोबर हे ही लक्षात ठेवावे की, कर्जाचे रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. जामीन होती वेळी साखळी पद्धतीने दोन / तीन कर्जदार सभासदास जामीन होण्याची दक्षता घ्यावी.
सभासद संख्या 1189, वसूलभाग भांडवल रु. 5 कोटी 51 लाख, सभासद ठेवी रु. 140 कोटी, फंड्स रु. 28 कोटी 92 लाख, गुंतवणूक रु. 15 कोटी 63 लाख, स्वमालकीच्या दोन सदनिका, येणे कर्ज रु. 289 कोटी 27 लाख .
दिनांक: ३०/०३/२०२५ चा नफा 1 कोटी 14 लाख
| अ. नं. | संचालकांचे नाव | पद |
|---|---|---|
| १ | श्री. साबळे प्रताप हनुमंत | चेअरमन |
| २ | श्री. भालेराव हरिष शिवराम | व्हाईस चेअरमन |
| ३ | श्री. मडके गोटीराम अंकुश | मानद सचिव |
| ४ | श्री. सुर्वे ज्ञानेश्वर देवराम | संचालक |
| ५ | श्री. डोखे सदानंद लहानू | संचालक |
| ६ | श्री. पगारे सुधाकर प्रभाकर | संचालक |
| ७ | श्री. थिगळे संतोष तात्याबा | संचालक |
| ८ | श्री. साळे श्रीकांत बाबासाहेब | संचालक |
| ९ | श्री. उंडे सुधिर दशरथ | संचालक |
| १० | श्री. साबळे संतोष कचरू | संचालक |
| ११ | श्री. देशमुख रवि हरिशचंद्र | संचालक |
| १२ | श्री. सातपुते प्रशांत दशरथ | संचालक |
| १३ | श्री. गोरे नवनाथ बारकु | संचालक |
| १४ | श्री. अडसुरे ज्ञानदेव शिवाजी | संचालक |
| १५ | श्री. जेजुरकर किशोर किसनराव | संचालक |
| १६ | श्री. खंडागळे संतोष हरिभाऊ | संचालक |
| १७ | श्रीमती. परोडकर संगिता किसनराव | संचालक |
| १८ | श्रीमती लांडगे सुरेखा सदाशिव | संचालक |
| १९ | श्रीमती गुंड अर्चना प्रकाश | संचालक |
| २० | श्री. बरबडे प्रशांत माधवराव | संचालक |
| २१ | श्री जाधव रामदास फक्कडराव | संचालक |
| अ. नं. | कर्मचारी नाव | पद |
|---|---|---|
| १ | श्री. शेडाळे राजेंद्र सुखदेव | व्यवस्थापक |
| २ | श्री. घिगे पवनकुमार पोपटराव | सेक्रेटरी |
| तपशील | सन 2020-2021 | सन 2021-2022 | सन 2022-2023 | सन 2023-2024 | सन 2024-2025 |
|---|---|---|---|---|---|
| सभासद संख्या | 1147 | 1203 | 1201 | 1206 | 1189 |
| वसूल भागभांडवल | 4,45,43,450 | 4,71,32,438 | 4,73,98,882 | 4,81,36,330 | 5,51,26,020 |
| कायम ठेव | 18,82,60,298 | 21,86,99,360 | 24,22,73,192 | 27,75,72,832 | 31,33,26,850 |
| मुदत ठेव | 33,48,04,548 | 61,10,68,892 | 93,50,64,732 | 1,17,04,69,555 | 1,38,53,83,800 |
| कुटुंब आधार ठेव | 18,75,500 | 72,84,230 | 1,21,03,095 | 1,68,87,123 | 2,14,73,233 |
| रिझर्व्ह फंड | 1,95,37,245 | 2,17,44,745 | 2,43,36,047 | 2,70,36,630 | 2,98,15,308 |
| इतर सर्व फंड | 3,60,10,610 | 8,04,29,104 | 11,15,48,850 | 17,52,65,263 | 25,94,37,960 |
| सर्व तरतुदी | 3,41,42,953 | 3,95,89,490 | 5,75,20,315 | 7,61,10,682 | 13,92,02,798 |
| बँक कर्ज | 31,96,06,015 | 44,56,48,988 | 61,85,39,755 | 75,85,66,570 | 85,37,78,920 |
| नफा | 88,03,600 | 1,03,64,004 | 1,07,95,131 | 1,11,11,111 | 1,14,20,342 |
| रिझर्व्ह फंड गुंतवणूक | 3,45,77,224 | 3,89,36,196 | 4,39,95,029 | 4,99,54,630 | 5,63,87,878 |
| इतर सर्व गुंतवणूक | 3,80,30,275 | 6,00,00,250 | 9,00,00,250 | 10,00,00,250 | 10,00,00,250 |
| स्थावर मालमत्ता | 1,07,71,571 | 1,07,71,571 | 1,05,50,056 | 1,05,50,056 | 1,05,50,056 |
| सभासद येणे कर्ज | 89,47,73,907 | 1,36,93,95,809 | 1,90,48,18,791 | 2,39,47,99,782 | 2,89,27,02,934 |
| ऑडिट वर्ग | अ | अ | अ | अ | अ |
| डिव्हिडंट | 15% | 15% | 15% | 15% | 15% |